Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wimbledon 2021: रॉजर फेडरर टेनिसला निरोप देणार का? दिग्गज खेळाडूने मौन सोडले
जगातील पूर्वीचा नंबर एकचा टेनिसपटू रॉजर फेडररचा विम्बल्डन 2021 मधील प्रवास संपुष्टात आला आहे. बुधवारी झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यानंतर रॉजर फेडररच्या भविष्याबद्दल बर्याच गोष्टी समोर येत आहेत. रॉजर फेडररने असेही म्हटले आहे की पुढच्या वर्षी या स्पर्धेत तो खेळताना दिसणार की नाही हे माहित नाही.(photo courtesy : @rogerfederer instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑल इंग्लंड क्लबमध्ये प्रेक्षकांनी उभे राहून आठ वेळा विम्बल्डन विजेतेपद मिळविलेल्या रॉजर फेडररचा सन्मान केला. फेडररचा 14 व्या मानांकित पोलंडच्या ह्युबर्ट हूरकाझने 6-3, 7-6, 6-0 असा पराभव केला. स्पर्धेत 22 व्या वेळी उतरलेल्या फेडररचा आश्चर्यकाररित्या एकतर्फी पराभव झाला.(photo courtesy : @rogerfederer instagram)
जगभरातील टेनिसप्रेमींना पाहण्याची सवय असलेला हा फेडरर नव्हता. गेल्या वर्षी गुडघ्याच्या ऑपरेशननंतर त्याने केवळ आठ सामने खेळले आहेत. अवघ्या एका महिन्यानंतर, आपला 40 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या फेडररच्या रॅकेटमधून पूर्वीसारखे स्ट्रोक निघाले नाहीत ज्यामुळे तो 20 वेळा ग्रँड स्लॅम विजेता ठरला होता. हा त्याचा शेवटचा सामना आहे का? असे विचारले असता फेडरर म्हणाला, माहित नाही. मला खरच माहीत नाही. मला आत्मपरीक्षण करावे लागेल.(photo courtesy : @rogerfederer instagram)
रॉजर फेडरर लगेच टेनिसमधून निवृत्त होणार नाही. रॉजर फेडररने अजूनही टेनिस खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रॉजर फेडरर म्हणाला, आत्ताच नाही, अजून खेळायचे ध्येय बाकी आहे.(photo courtesy : @rogerfederer instagram)
त्याच्या 429 ग्रँड स्लॅम सामन्यात फेडररने तिसऱ्यांदा सेट 6-0 ने गमावला. यापूर्वी फ्रेंच ओपनमध्ये दोन्ही वेळा हा प्रकार घडला होता. फेडरर म्हणाला, “मागील काही सामने अपेक्षेप्रमाणे नव्हते. मला या प्रकारच्या परिस्थितीची सवय नाही, इथं तर अजिबात नाही.(photo courtesy : @rogerfederer instagram)
फेडररला आपला आदर्श मानणारे हूरकाझ म्हणाले की त्याने या निकालाची कल्पनाही केली नव्हती. पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात हुकराज यशस्वी झाला आहे.(photo courtesy : @rogerfederer instagram)
रॉजर फेडरर पुन्हा मैदानात दिसणार की नाही हे काळच ठरवेल.(photo courtesy : @rogerfederer instagram)