Tokyo Olympics 2020 Pics | टोकियो ऑलिम्पिकचं उद्घाटन संपन्न, मेरी कोम आणि मनप्रीत सिंग ध्वजवाहकाच्या भूमिकेत
जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक खेळ एका वर्षासाठी रद्द करण्यात आले होते.(photo tweeted by @Tokyo2020hi)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना साथीमुळे या समारंभात भारतातील 22 खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यांच्यासमवेत या सोहळ्यास 6 अधिकारीही सहभागी झाले आहेत.(Photo by getty images)
बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग दोघे ध्वजवाहकाच्या भूमिकेत होते. (photo tweeted by @Tokyo2020hi)
ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अतिशय दिमाखात रंगला. उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी 21 व्या क्रमांकावर होती. (Photo by getty images)
कोरोना आजारामुळे ऑलिम्पिक खेळांमध्ये बरेच मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. खेळाडूंना कोरोना विषाणूच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी अतिशय कठोर बायो बबल (जैव सुरक्षा कवच) तयार केला गेला आहे(photo tweeted by @Tokyo2020hi)
टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय मैदानावर खेळला जात आहे. कोरोना संसर्गाने खेळाडूंच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत(photo tweeted by @Tokyo2020hi)
कोरोना महामारीमुळे खेळाडूंना दररोज कोविड 19 चाचणीतून जावे लागणार आहे. कोविड 19 चाचणी अहवालाशिवाय कोणत्याही खेळाडूला मैदानावर प्रवेश मिळणार नाही.(photo tweeted by @Tokyo2020hi)
इतकेच नाही तर एखाद्या खेळाडूने अंतिम फेरी गाठली असेल आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर त्याला पदकाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागेल.(photo tweeted by @Tokyo2020hi)