In Pics | ...आणि चर्चा सुरु झाली ईशा- ऋषभ पंतच्या नात्याची
ishanegi_feature
1/5
भारतीय क्रिकेट संघात मागील काही काळापासून चर्चेत असणारा ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाचं नेतृत्त्वं करताना दिसणार आहे. भारतीय संघातील त्याचा उंचावता आलेख ते दिल्लीच्या संघाचं कर्णधारपद या साऱ्यामध्ये ऋषभला काही खास व्यक्तींची साथ मिळाली. यामध्ये संघातील खेळाडू, त्याचा मित्रपरिवार, कुटुंबीय आणि आणखी एका खास व्यक्तीचा समावेश होता आणि आहे. ही खाय व्यक्ती म्हणजे त्याची प्रेयसी, ईशा नेगी.
2/5
खुद्द पंतनं सोशल मीडियावर ईशासोबतचा फोटो शेअर केल्यापासून तिच्या नावाची चर्चा आणखीनच वाढली. सूत्रांच्या माहितीनुसार ईशानं दिल्लीच्या अॅमिटी विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतलं आहे.
3/5
कॉन्वेंट ऑफ जिजस अँड मेरी स्कूल, देहरादून येथून तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं असल्याचं म्हटलं जातं.
4/5
ईशा नेगीच्या सोशल मीडिया हँडलवर दिलेल्या माहितीनुसार ती नवउद्यमी इंटेरिअर डेकॉर डिझायनर आहे.
5/5
(सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)
Published at : 31 Mar 2021 04:43 PM (IST)