Satara : ऊसतोड मजुराची मुलगी करणार भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व
सातारा (Satara) जिल्ह्यातील ऊसतोड करणाऱ्या दामप्त्याच्या लेकीनं कौतुकास्पद कामगिरी केलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. काजलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, नियमित सराव आणि आत्मविश्वासाने भारतीय हॉकी संघात स्थान मिळवलंय.
काजलच्या यशामागचे श्रेय खऱ्या अर्थाने तिच्या शिक्षकांबरोबर आई-वडिलांचेही आहे.
जे आईवडील ऊसतोड कामगार म्हणून सहा सहा महिने गावोगावी फिरून पालावर राहतात. तर राहिलेले सहा महिने गावाकडे येऊन मिळेल तेथे मजुरी करतात.
आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल आटपाडकर ही जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे चार देशांच्या ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे नेतृत्व करणार आहे.
माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजल करणार भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व
काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. काजलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, नियमित सराव आणि आत्मविश्वासाने भारतीय हॉकी संघात स्थान मिळवलंय.
काजलच्या कामगिरीची सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
आई वडिलांनी केलेल्या कष्टाला यश मिळालं आहे.