Novak Djokovic ठरला आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियन!
(Photo:@djokovicofficial/Photo)
1/9
टेनिस स्टार नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यानं एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. सात वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियन बनणारा जोकोविच हा पहिला खेळाडू ठरला आहे. (Photo:@djokovicofficial/Photo)
2/9
जोकोविचच्या आधी पीट सम्प्रास (Pete Sampras) यांनी सहा वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा बहुमान मिळवला होता. (Photo:@djokovicofficial/Photo)
3/9
इंटरनेशनल टेनिस फेडरेशननं (आयटीएफ) ने गुरुवारी याची घोषणा केली. यासंदर्भात इंटरनेशनल टेनिस फेडरेशनच्या ट्विटर हँडलवरुन ट्वीटही करण्यात आलं आहे. (Photo:@djokovicofficial/Photo)
4/9
नोवाक जोकोविचसाठी हे वर्ष उत्तम ठरलं. त्यानं यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बलडन ग्रँड स्लॅम टूर्नामेंट आपल्या नावे केला. तर यूएस ओपनमध्ये जोकोविच उपविजेता ठरला. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये जोकोविच सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. जर जोकोविचला यूएस ओपन आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी खेळी करता आली असती, तर त्यानं गोल्डन स्लॅम आपल्या नावे केलं असतं. (Photo:@djokovicofficial/Photo)
5/9
आपल्या दमदार खेळीच्या जोरावर जोकोविच सध्या रॅकिंगमध्ये टॉपवर आहे. टॉप रॅकिंगसह त्यानं सातव्यांदा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा किताब आपल्या नावे केला आहे. (Photo:@djokovicofficial/Photo)
6/9
जोकोविचपूर्वी अमेरिकेचे माजी दिग्गज टेनिसपटू पीट सम्प्रास यांनी सहा वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा किताब पटकावला होता. (Photo:@djokovicofficial/Photo)
7/9
जोकोविचनं आपल्या करिअरमध्ये एकूण 20 ग्रँड स्लॅम किताब पटकावले आहेत. (Photo:@djokovicofficial/Photo)
8/9
जोकोविचनं ग्रँड स्लॅमचा किताब पटकावण्याच्या बाबतीत टेनिसस्टार राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्याशी बरोबरी केली आहे. (Photo:@djokovicofficial/Photo)
9/9
(Photo:@djokovicofficial/Photo)
Published at : 17 Dec 2021 01:23 PM (IST)