IPL : प्लेऑफ-फायनलमध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर, मिस्टर आयपीएल अव्वल
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील क्वालीफायर सामने आजपासून सुरु होत आहेत. आयपीएलमध्ये प्लेऑफ आणि फायनल स्पर्धेतील अतिशय महत्वाचे सामने असतात. तर या सामन्यात कोणकोणत्या खेळाडूनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. यावर एकर टाकुयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया यादीत बहुतांश खेळाडू हे चेन्नई सुपरकिंग्स संघाचेच आहेत.
आयपीएलच्या इतिहासातील प्लेऑफ आणि फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. रैनानं 714 धावा केल्या आहेत.
या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 522 धावा केल्या आहेत.
तर, 389 धावांसह शेन वॉटसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्यानंतर मायकल हसी 388 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
मुरली विजय 364 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
सहाव्या क्रमांकावर 356 धावांसह ड्वेन स्मिथ आहे.
स्मिथ नंतर फाफ डु प्लेसीस 348 धावांसह आहे.
तर यादीत आठ नंबरला कायरन पोलार्ड 341 धावांसह आहे.