IPL 2023 : 'माँ ने खाना नहीं खाया', रिंकूने सलग 5 षटकार ठोकलेल्या गोलंदाजासाठी कठीण रात्र, यश दयालचे वडील म्हणाले...
केकेआरचा फलंदाज रिंकू सिंहने शेवटच्या षटकात गुजरातच्या गोलंदाजाचा पुरत नमवलं. रिंकू सिंहने गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याच्या षटकात पाच चेंडूत सलग पाच षटकार ठोकून कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिंकूनं यश दयालविरुद्ध सलग 5 षटकार ठोकून केकेआरला विजय मिळवून दिलाच, पण साथीदाराला सर्वात मोठा झटकाही दिला आहे.
रिंकूने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. या धमाकेदार खेळीमुळे रिंकू सिंह रातोरात सुपरस्टार झाला आहे. पण, यश दयालसाठीही सामना अविस्मरणीय ठरला. या सामन्यात रिंकू सिंहने मित्र यशला चांगलंच झोडपलं. या सामन्यात यशने 4 षटकात 69 धावा दिल्या आहेत.
रिंकू सिंह आणि यश दयाल दोघेही चांगले मित्र आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगले संबंध आहेत. प्रसंगी दोघेही एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात. अलीकडेच आयपीएल सामन्यात रिंकू सिंहच्या आरसीबी (RCB) विरुद्धच्या धडाकेबाज खेळीनंतर यशने रिंकूचं कौतुक केलं होतं. त्यानंतर दोनचं दिवसांनी रिंकूनं त्याचं मित्राला अडचणीत टाकलं आहे.
यश दयाल हा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी आहे. यशचे वडील चंद्रपाल हे देखील त्यांच्या काळातील चांगले वेगवान गोलंदाज होते.
एवढेच नाही तर या गोलंदाजाची आयपीएल 2022 मधील शानदार कामगिरीनंतर बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात यश दयालची निवड झाली. पण यशला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
आयपीएल 2023 मधील केकेआरच्या रिंकू सिंहच्या पाच षटकारांची सर्वत्र चर्चा आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्ससाठी गोलंदाज यश दयालची कामगिरी निराशाजनक ठरली.
एकीकडे संपूर्ण देश रिंकूसाठी जल्लोष करत असताना, तर दुसरीकडे यश दयालच्या घरातील वातावरण वेगळंच होतं. यश दयालच्या वडीलांनी एका मीडिया मुलाखतीत सांगितलं की, तो सामना त्यांच्यासाठी वाईट स्वप्नासारखा होता. यशची आईने त्या रात्री जेवलीही नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना यशचे वडील चंद्रपाल दयाल म्हणाले, की, संघाने यशला पाच षटकार खाल्ल्यानंतरही एकटं सोडलं नाही. जीवनात अपयशालाही सामोरं जावं लागतं. तुम्ही पुन्हा खंबीरपणे उभं राहणं महत्त्वाचं आहे.
चंद्रपाल दयाल यांनी पुढे सांगितलं की, हॉटेलमध्ये परतल्यावर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यासह संघातील प्रत्येक खेळाडूने यशला पाठिंबा दिला आणि त्याला धीर दिला. नंतर काही नाच-गाणंही झालं. सर्वांनी यशला प्रोत्साहन दिलं आणि त्याला खुश करण्याचा प्रयत्न केला.
यश दयाल हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याचा आयपीएलमधील हा दुसरा हंगाम आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावात त्याला गुजरात टायटन्सने 3.2 कोटी रुपयांना विकत घेतलं. यशने पदार्पणाच्या मोसमात 9 सामन्यात 11 विकेट घेतल्या.
गेल्या मोसमात त्याने चांगली गोलंदाजी केली. यशसाठी आयपीएल पदार्पण दमदार ठरलं. त्यानं राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 4 षटकात 40 धावा देत तीन बळी घेतले होते. यशने शानदार खेळी करत अवघ्या 9 सामन्यांत 11 बळी घेत गेल्या मोसमात गुजरातला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.