Nikhil Sosale Arrested : विराट-अनुष्काच्या खास मित्रांना अटक, बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरण आरसीबीला भोवले, कोणते गुन्हे दाखल?
Bengaluru Stadium Stampede News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी घाईघाईने जल्लोष करणे आणि विजय परेड काढणे महागात भोवले आहे.
Continues below advertisement
Who Is Nikhil Sosale RCB Marketing Head Arrested
Continues below advertisement
1/10
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी घाईघाईने जल्लोष करणे आणि विजय परेड काढणे महागात पडते.
2/10
विजय परेडसाठी सुरक्षा देण्यास नकार देणाऱ्या बंगळुरू पोलिसांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आदेशानंतर शुक्रवारी कर्नाटकातून निखिल सोसाळे, किरण कुमार आणि सुनील मॅथ्यू यांना अटक केली.
3/10
निखिल सोसाळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू येथे मार्केटिंग आणि महसूल प्रमुख म्हणून काम करतात, तर किरण आणि मॅथ्यू डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्कचे कर्मचारी आहेत.
4/10
वृत्तानुसार, निखिल बंगळुरूहून मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर आला होता.
5/10
बंगळुरू पोलिसांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
Continues below advertisement
6/10
या सर्वांवर गुन्हेगारी निष्काळजीपणाचा आरोप आहे.
7/10
अशाप्रकारे, आरसीबीच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
8/10
स्टेडियमजवळ सुमारे 3 लाख लोक जमले, तर स्टेडियमची क्षमता फक्त 32 हजार आहे.
9/10
चेंगराचेंगरी 11 चाहत्यांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 50 जण जखमी झाले आहेत.
10/10
गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आरसीबी, डीएनए आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले.
Published at : 06 Jun 2025 10:04 AM (IST)