Virat Kohli IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी; आज नंबर 1 होणार?
Virat Kohli IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायट्स यांच्यात सामना रंगणार आहे.
Continues below advertisement
Virat Kohli IPL 2025
Continues below advertisement
1/6
Virat Kohli IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायट्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात बंगळुरुचा फलंदाज विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी आहे. आज विराट कोहलीने अर्धशतक केल्यास आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारा खेळाडू ठरेल.
2/6
आयपीएलमध्ये विराट कोहलीने डेव्हिड वॉर्नरइतकेच अर्धशतके केली आहेत. विराट आणि वॉर्नरने एकूण 62 अर्धशतके ठोकली आहेत. त्यामुळे आज विराट कोहलीने अर्धशतक झळकवल्यास इतिहास रचला जाईल.
3/6
सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याच्या बाबतीत कोहलीच्या जवळ आहे. ज्याने 46 अर्धशतके केली आहेत.
4/6
या सामन्यात कोहलीला आणखी एक विक्रम मोडण्याची संधी असेल. जर कोहलीने 24 धावा केल्या तर तो कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीसाठी 9000 धावा करणारा पहिला खेळाडू बनेल.
5/6
कोहलीने आरसीबीकडून खेळताना आतापर्यंत 270 डावांमध्ये 8976 धावा केल्या आहेत.
Continues below advertisement
6/6
आरसीबीने आजचा सामना जिंकला तर ते पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये स्थान मिळवतील. तसेच आज विजयी झाल्यास आरसीबीचा सामना क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्जशी होईल.
Published at : 27 May 2025 04:49 PM (IST)