IPL 2022 : 'या' 10 रिटेन खेळाडूंनी केली निराशा, यंदाच्या हंगामात खराब कामगिरीमुळे संघाची डोकेदुखी वाढवली
या यादीत सर्वात पहिलं नाव आहे. केकेआरच्य वेंकटेश अय्यरचं. वेंकटेशने 2021 मध्ये दमदार कामगिरी केली होत त्यामुळे त्याला यंदासाठी केकेआरने तब्बल 8 कोटी रुपयांना रिटेन केलं. पण त्याने यंदा गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत निराशाजनक कामगिरी केली. वेंकटेशने 9 सामन्याक 16.50 च्या सरासरीने फलंदाजी करत केवळ 132 रन केले आहेत. तर केवळ तीन ओव्हर फेकल्या असून यात 38 धावा देत एकही विकेट घेतलेली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेकेआरचा आणखी एक चूकलेला निर्णय म्हणजे फिरकीपटू वरुन चक्रवर्थीला त्यांनी रिटेन केलं होतं. तब्बल 8 कोटींना रिटेन केलेल्याा वरुणनने 8 सामन्यात केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या रवींद्रने काही सामन्यांपूर्वी कर्णधारपद पुन्हा धोनीला दिलं आहे. जाडेजालाही 16 कोटींना चेन्नईने रिटेन केलं होतं. पण त्याने यंदाच्या हंगामात खराब कामगिरी केली आहे. त्याने 10 सामन्यात 19.33 च्या सरासरीने 116 रन केले असून केवळ 5 विकेट्स यंदा घेतले आहेत.
यानंतर स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ पण यंदा खराब कामगिरीमुळे सर्वात आधी स्पर्धेबाहेर गेलेल्या मुंबई इंडियन्सचा विचार करता त्यांनी रिटेन केलेल्या दोन खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे. यात कर्णधार रोहितला 16 कोटी दिले असले तरी त्याने 10 सामन्यात 19.80 च्या सरासरीने केवळ 198 केले आहेत. त्याने एक अर्धशतकही ठोकलेलं नाही.
मुंबईचा दुसरा खेळाडू म्हटलं तर उपकर्णधार केरॉन पोलार्ज. 6 कोटींना मुंबईत सामिल झालेल्या पोलार्डने यंदा 14.33 च्या सरासरीने केवळ 129 रन केले असून गोलंदाजीतही खास कामगिरी केलेली नाही.
भारताचा सर्वात दमदार फलंदाज विराट कोहली यंदा खराब फॉर्ममध्ये असून आयपीएलमध्येही हा फॉर्म कायम आहे. त्याला RCB ने 15 कोटींना रिटेन केलं होतं. पण विराटने 12 सामन्यात 21.60 च्या सरासरीने 216 रन केले आहेत.
आरसीबीचा आणखी एक स्टार खेळाडू म्हणजे ग्लेन मॅक्सवेल. त्याला संघाने 11 कोटींना रिटेन केलं. पण या अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजीत खास कमाल केली नसून 9 सामन्यात 171 रनच केले आहेत.
वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाने आतापर्यंत 2 सामने खेळले असून त्याने 2 सामन्यात 70 धावा देत एकच विकेट घेतली आहे. त्याला दिल्लीने 6.50 कोटींना रिटेन केलं होतं.
सनरायजर्स हैदराबादने अब्दुल समदला 4 कोटींना रिटेन केलं. पण या खेळाडूंना दोन सामन्यात केवळ 4 रन केले आहेत.
पंजाब संघाचं कर्णधारपद मिळालेल्या मयांकला पंजाबने 12 कोटी देत रिटेन केलं. पण त्याने 10 सामन्यात 176 धावाच केल्या असून त्याने एकच अर्धशतक ठोकलं आहे.