Suryakumar Yadav News : सूर्या दादाची एकच फाईट, वातावरण ताईट; टी-20 मध्ये असा पराक्रम करणारा बनला जगातील पहिला फलंदाज

Suryakumar Yadav Most consecutive 25+ scores in T20s : सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक नवा आणि महान विक्रम रचला आहे.

Suryakumar Yadav Most consecutive 25+ scores in T20s

1/9
सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक नवा आणि महान विक्रम रचला आहे.
2/9
अद्याप कोणत्याही भारतीय फलंदाजाला हे करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावुमाने हे निश्चितच एकदा केले असले तरी आता सूर्यकुमार यादवने त्याची बरोबरी केली आहे.
3/9
यावर्षीच्या आयपीएलमध्ये सूर्याला कदाचित मोठी खेळी करता आली नसेल, पण त्याने त्याच्या छोट्या आणि प्रभावी खेळीने एक विक्रम रचला आहे.
4/9
आतापर्यंत टी-20 क्रिकेटच्या इतिहासात, टेम्बा बावुमा हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने सलग 13 डावांमध्ये 25 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने 2019 ते 2020 या काळात हा पराक्रम केला होता.
5/9
पण आता त्याच वर्षी, अवघ्या काही दिवसांच्या अंतराने सूर्यकुमार यादवने त्याची बरोबरी केली आहे.
6/9
सूर्या एका वर्षात सर्वाधिक वेळा सलग 25 धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
7/9
सूर्यकुमार यादवने या वर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये किमान 25 धावा केल्या आहेत.
8/9
अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला फलंदाज ठरला आहे.
9/9
ब्रॅड हॉज, जॅक रुडॉल्फ, कुमार संगकारा, ख्रिस लिन आणि काइल मेयर्स यांनी आतापर्यंत 11 वेळा हे केले आहे.
Sponsored Links by Taboola