IPL 2023, MI vs RCB : विराट-फाफची वादळी अर्धशतके, मुंबईचा 8 विकेटने पराभव

MI vs RCB, Match Highlights : आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.

Continues below advertisement

MI vs RCB

Continues below advertisement
1/11
विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या बळावर आरसीबीने मुंबईचा 8 विकेटने पराभव केला. मुंबईने दिलेले 172 धावांचे आव्हान आरसीबीने 22 चेंडू आणि 8 विकेट राखून पार केले.
2/11
मुंबईचा पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या 16 व्या हंगामाची सुरुवात विजायाने केली. तर मुंबईने नेहमीप्रमाणे पहिला सामना गमावला आहे. 2013 पासून मुंबईला आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला नाही.
3/11
विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या फलंदाजीपुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी दिसत होती. या दोघांच्या फटकेबाजीपुढे मुंबईच्या गोलंदाजांनी नांग्या टाकल्या होत्या. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 14.5 षटकात 148 धावांची भागिदारी केली. या दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला
4/11
फाफ डु प्लेसिस याने 73 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने सहा षटकार आणि पाच चौकार लगावले. फाफ बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आरसीबीला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले. मॅक्सवेल 12 धावांवर नाबाद होता.
5/11
171 धावांचा बचाव करताना मुंबईची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. मुंबईच्या गोलंदाजीत बुमराहच्या धारधार गोलंदाजीची कमी दिसत होती. मुंबईच्या एकाही गोलंदाजामध्ये धार दिसत नव्हती. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी मुंबईची गोलंदाजी फोडून काढली.
Continues below advertisement
6/11
बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळत होता. पण जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीत धार दिसत नव्हती. विराट कोहली आणि फाफ यांनी जोफ्राची पिटाई केली. जोफ्राच्या चार षटकात दोघांनी 33 धावा वसूल केल्या.
7/11
मुंबईकडून अरशद खान आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. अरशद खान याने फाफ याचा अडथळा दूर केला. तर कॅमरुन ग्रीन याने दिनेश कार्तिकला बाद केले. या दोघांचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजी प्रभावहीन ठरली. जेसन बेहरडॉफ, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, ऋतिक शौकिन यांना विकेट घेता आली नाही आणि धावाही रोखता आल्या नाहीत. पियुष चावला याने 4 षटकात फक्त 26 धावा दिल्या पण विकेट घेता आली नाही.
8/11
दरम्यान, तिलक वर्माच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 171 धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्मा याने नाबाद 84 धावांची खेळी केली. तिलक वर्माचा अपवाद वगळता एका फलंदाजाला 30 धावांची संख्या ओलाडंता आली नाही.
9/11
मुंबई इंडियन्सचा गेल्या हंगामातील हिरो तिलक वर्मा याने यंदाच्या हंगामतील पहिल्याच सामन्यात झुंझार खेळी केली. तिलक वर्मा याने शानदार अर्धशतक झळकावले. एका बाजूला विकेट पडत तिलक वर्मा याने संयमी आणि आक्रमकपणे अर्धशतक झळकावले. तिलक वर्माने नेहाल वढेरासोबत अर्धशतकी भागिदारी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. तिलक वर्माने दबावात अर्धशतक झळकावले. तिलक वर्मा याने 46 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 9 चौकार लगावले.
10/11
कर्णधार रोहित शर्माला कर्णधाराला साजेशी फलंदाजी करता आली नाही. इशान किशन आणि कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर रोहित शर्माने आपली विकेट फेकली. रोहित शर्माने दहा चेंडूचा सामना करताना फक्त एक धाव केली. आकाशदीपने रोहित शर्माला बाद केले.
11/11
ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. ईशान किशन याने 13 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. मोहम्मद सिराज याने ईशान किशनचा अडथळा दूर केला. जगातील आघाडीचा टी 20 खेळाडू सूर्यकुमार यादव यालाही मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव 16 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला. ब्रेसवेल याने सूर्याचा अडथळा दूर केला. ऋतिक शौकिन यालाही मोठी खेळी करता आली नाही. तो पाच धावा काढून तंबूत परतला.
Sponsored Links by Taboola