RCB vs CSK IPL 2023 1st Innings : चेन्नईनं बंगळुरुच्या फलंदाजांना धुतलं, आरसीबीसमोर 227 धावांचं लक्ष्य

आयपीएलच्या 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आरसीबीने नाणेफाक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या फलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना चांगलंच धुतलं.

चेन्नई संघाने सहा गडी बाद 226 धावांची खेळी केली. चेन्नई संघाने बंगळुरु संघाला 227 धावांचं लक्ष्य दिलं आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची संथ सुरुवात झाली. पहिल्या षटकात चेन्नईला फक्त तीनच धावा करता आल्या.
पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईची संथ सुरुवात झाली. पहिल्या षटकात चेन्नईला फक्त तीनच धावा करता आल्या.
त्यानंतर तिसऱ्या षटकात चेन्नईला पहिला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज गायकवाड झेलबाद झाला. त्यानंतर रहाणे मैदानात आला.
रहाणे मैदानात आल्यावर मैदानात धावांचा पाऊस पाडला.
पॉवर प्लेमध्ये चेन्नई सुपर किंग्सने 1 गडी गमावून 53 धावा केल्या. यादरम्यान अजिंक्य रहाणेने स्फोटक फलंदाजी केली.
रहाणेने 14 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या. त्याचवेळी कॉनवेही चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला.
चेन्नईने दहाव्या षटकात 90 धावांवर दुसरी विकेट गमावली. अजिंक्य रहाणे 20 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
रहाणेला हसरंगाने बोल्ड केलं. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी कॉनवे आणि शिवमने चांगली भागीदारी केली.