IPL 2021 : पृथ्वी शॉची प्रशंसा करत कथित प्रेयसी म्हणते...
41 चेंडूंमध्ये 82 धावा ठोकणाऱ्या आणि आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्लीच्या संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ याला सध्या एका खास व्यक्तीचा पाठिंबा मिळत आहे. एकिकडे पृथ्वीवर क्रीडा वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे त्याची कथित प्रेयसी प्राची सिंह हिसुद्धा त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकात्याच्या संघाविरोधात केलेल्या दमदार प्रदर्शनानंतर पृथ्वी शॉ़ची वाहवा करण्यात आली.
सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्राचीनंही खास स्टेटस शेअर केल्याचं पाहायला मिळालं.
मला तुझा फार अभिमान आहे, असं लिहित तिनं त्याचा सामनावीर म्हणून चर्चेत असणारा फोटोही शेअर केला.
एकिकडे ऑन फिल्ड त्याच्या कामगिरीच चर्चा असतानाच त्याच्या खासगी जीवनानंही अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री प्राची सिंह हिच्याशी त्याचं नाव जोडलं जात असून, त्यांचं नातं सध्या बरंच प्रकाशझोतातही येत आहे. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)