PBKS Ashutosh Sharma: मुंबईची धाकधूक वाढवणाऱ्या आशुतोषची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी, एक वेळचं जेवणही मिळत नव्हतं!

PBKS Ashutosh Sharma: आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणारा आशुतोष खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.

Ashutosh Sharma

1/9
मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 7 बाद 192 धावा केल्यानंतर पंजाब किंग्सला 19.1 षटकांत 183 धावांत गुंडाळले. धावांचा पाठलाग करताना पंजाबची 7 बाद 111 धावा, अशी अवस्था झाली होती. (Image Credit-IPL)
2/9
पंजाबच्या आशुतोष शर्माने जबरदस्त फटकेबाजी करत मुंबईला पराभवाच्या उंबरठ्यावर आणले होते. त्याने आठव्या गड्यासाठी हरप्रीत ब्रारसोबत 32 चेंडूंत 57 धावांची भागीदारी केली. 18 व्या षटकात कोएत्झीने आशुतोषला बाद करून सामना मुंबईच्या बाजूने झुकवला. त्याच्यासह बुमराहनेही तीन बळी घेत पंजाबच्या फलंदाजीला - खिंडार पाडले. (Image Credit-IPL)
3/9
आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्सकडून खेळणारा आशुतोष खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. पण इथपर्यंत पोहोचणे आशुतोषसाठी अजिबात सोपे नव्हते. (Social Media)
4/9
क्रिकेट खेळण्यासाठी आशुतोषला अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. क्रिकेटर होण्यासाठी त्याने वयाच्या ८ व्या वर्षी घर सोडले होते. (Social Media)
5/9
याशिवाय आशुतोषवर एक वेळ अशी आली जेव्हा त्याला उदरनिर्वाह करणेही कठीण झाले.आशुतोषने त्याच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, एक वेळ जेवण मिळण्यासाठी एकदा क्लब सामन्यांमध्ये अंपायरिंग केली होती. (Social Media)
6/9
आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात त्याला पंजाब किंग्सने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. आता 20 लाख रुपये किंमतीचा आशुतोष पंजाबसाठी करोडो रुपयांच्या खेळाडूचे काम करत आहे.(Social Media)
7/9
आयपीएल 2024 च्या हंगामात आशुतोषने आतापर्यंत चार डावांत फलंदाजी केली आहे हे विशेष. आशुतोषने चारही डावात 30 धावांचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 61 होती.(Social Media)
8/9
कोण आहेत आशुतोष शर्मा?- आशुतोष शर्मा यांचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला होता. तो रेल्वेकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. पण पूर्वी तो फक्त मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असे. मीडिया रिपोर्ट्सवर 2020 मध्ये मध्य प्रदेश संघ सोडावा लागला होता. चंद्रकांत पंडित मध्य प्रदेशचे प्रशिक्षक झाल्यावर आशुतोषला राज्य संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, त्यानंतर तो रेल्वे संघात सामील झाला. भारताकडून खेळलेल्या नमन ओझाने आशुतोषला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत केल्याचे बोलले जाते. आशुतोष लहानपणी नमनचा चाहता होता. नमन ओझा हा देखील मध्य प्रदेशचा आहे. (Image Credit-IPL)
9/9
11 चेंडूत झळकावलेय अर्धशतक- गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला होता. स्पर्धेतील क गटातील सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध आशुतोषने 11 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा 16 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. युवराज सिंगने 2007 च्या T20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.(Image Credit-IPL)
Sponsored Links by Taboola