MI vs PBKS Qualifier 2 IPL 2025: क्वालिफायर-2 च्या सामन्यात मुंबई अन् पंजाबमधील 5 खेळाडूंवर नजर; एका झटक्यात सामना फिरवण्याची ताकद!

MI vs PBKS Qualifier 2 IPL 2025: क्वालिफायर-2 च्या सामन्यात मुंबई अन् पंजाबमधील 5 खेळाडूंवर नजर असणार आहे. या खेळाडूंमध्ये एका झटक्यात सामना फिरवण्याची ताकद आहे.

Continues below advertisement

MI vs PBKS Qualifier 2 IPL 2025

Continues below advertisement
1/6
आयपीएल 2025 च्या हंगामात आज क्वालिफायर-2 चा सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आज क्वालिफायर-2 चा सामना खेळवला जाईल. या सामन्यात विजयी होणारा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत 3 जून रोजी अंतिम सामना खेळेल. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येईल. क्वालिफायर-2 च्या सामन्यात मुंबई अन् पंजाबमधील 5 खेळाडूंवर नजर असणार आहे. या खेळाडूंमध्ये एका झटक्यात सामना फिरवण्याची ताकद आहे.
2/6
रोहित शर्माने गुजरातविरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये शानदार कामगिरी केली. रोहित शर्मा मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे. रोहितने गुजरातविरुद्ध 50 चेंडूत 81 धावा केल्या. रोहित शर्मा पंजाबविरुद्धही उत्तम खेळी करू शकतो.
3/6
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर या वर्षी उत्तम फॉर्ममध्ये आहे. श्रेयस अय्यरने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरकडे एकट्याने सामना फिरवण्याची ताकद आहे. पंजाबच्या चाहत्यांच्या नजरा अय्यरवर असतील.
4/6
मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वात घातक गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडे त्याच्या गोलंदाजीने सामना फिरवण्याची ताकद आहे. जसप्रीत बुमराहने या हंगामात 18 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, त्याचा इकॉनॉमी रेट 7 पेक्षा कमी आहे.
5/6
पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या वर्षी शानदार गोलंदाजी केली आहे. तो पंजाबचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. अर्शदीप सिंगने आतापर्यंत 18 विकेट्स घेतल्या आहेत.
Continues below advertisement
6/6
सूर्यकुमार यादव या वर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सूर्याने या हंगामात प्रत्येक सामन्यात 25 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सूर्याने आतापर्यंत 650 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवकडे त्याच्या फलंदाजीने सामना संघाच्या बाजूने वळवण्याची ताकद आहे.
Sponsored Links by Taboola