MI vs PBKS IPL 2025: स्वप्नभंग होताच हार्दिक कोसळला, नीता अंबानी कपाळाला हात लावून बसल्या; रोहित शर्माचा फोटो पाहून चाहते हळहळले
MI vs PBKS IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामातील क्वालिफायर-2 च्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह पंजाबने आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
Continues below advertisement
MI vs PBKS IPL 2025
Continues below advertisement
1/9
आयपीएल 2025 च्या हंगामात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. (Photo Credit- IPL)
2/9
क्वालिफायर-2 च्या सामन्यात पंजाब किंग्सने 5 विकेट्सने विजय मिळवत तब्बल 11 वर्षांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात एन्ट्री मारली. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने 41 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी करून पंजाबच्या ऐतिहासिक विजयात मोठे योगदान दिले. (Photo Credit- IPL)
3/9
सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा युवा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमार देखील भावनिक झाला. यावेळी जसप्रीत बुमराहने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.
4/9
सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मैदानावर बसला. तो खूप भावनिक झाला.
5/9
हार्दिक पांड्या भावूक झाल्याचे पाहताच पंजाबचा खेळाडू मार्कस स्टॉयनिसने त्याला धीर दिला.
Continues below advertisement
6/9
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील निराश दिसला. रोहित शर्माचा हा फोटो पाहून चाहते हळहळल्याचे दिसून आले.
7/9
मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबीनी या देखील पराभवानंतर खूर निराश दिसल्या.
8/9
सामना जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर रोहित शर्माला भेटल्याचे दिसून आले. यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी देखील मारली.
9/9
दरम्यान ३ जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब संघात विजेतेपदासाठी लढत होईल. महत्वाचं म्हणजे आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात या दोन्ही संघानी ही स्पर्धा एकदाही जिंकलेली नाही. त्यामुळे यंदाच्या मोसमात पंजाब किंवा बंगळुरुच्या रुपानं आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे.
Published at : 02 Jun 2025 08:28 AM (IST)