Karun Nair Golden Duck Ipl 2025 : 6 डावात 65 धावा, दोनदा शुन्यावर... ‘मला आणखी एक संधी द्या’ म्हणणारा करुण नायरच्या बॅटला लागला गंज
Karun Nair Golden Duck Ipl 2025 : पहिल्या सामन्यात 89 धावा केल्यानंतर करुण नायरला काही खास कामगिरी करता आलेली नाही.
Karun Nair Golden Duck Ipl 2025
1/9
गेल्या काही वर्षांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये करुण नायरने आपल्या खेळाची झलक वेळोवेळी दाखवली आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याने “प्रिय क्रिकेट, मला आणखी एक संधी दे,” अशी पोस्ट ट्वीटरवर केली होती. त्यानंतर करुण नायरला आयपीएल 2025 मध्ये संधी मिळाली.
2/9
सुरुवातीच्या सामन्यांमध्ये बेंचवर बसल्यानंतर नायरला मुंबई इंडियन्सविरुद्ध चमकला.
3/9
13 एप्रिल 2025 झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात करुण नायरने दमदार फलंदाजी करत आपलं नाणं खणखणीत वाजवलं.
4/9
नायरने फक्त 40 चेंडूत 89 धावांची खेळी खेळली. मुंबईने सामना जिंकला पण करुण नायरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण, यानंतर नायरची बॅट शांत झाली.
5/9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या करुण नायरची बॅट शांत राहिली. त्या सामन्यात तो गोल्डन डक बनला.
6/9
मोहम्मद शमी हा सामना खेळत नाहीये. अशा परिस्थितीत, कर्णधार पॅट कमिन्सने स्वतः पहिले षटक टाकले. त्याने पहिल्याच चेंडूवर करुण नायरला आऊट केले.
7/9
पहिल्या सामन्यात 89 धावा केल्यानंतर करुण नायरला काही खास कामगिरी करता आलेली नाही. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पुढच्या सामन्यात तो खाते न उघडताच धावबाद झाला.
8/9
त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध 31 धावा केल्या. तो लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 15 धावा आणि आरसीबीविरुद्ध फक्त 4 धावा करून बाद झाला.
9/9
केकेआर विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 15 धावा केल्या होत्या. आता तो हैदराबादविरुद्ध आपले खातेही उघडू शकला नाही. अशाप्रकारे, गेल्या 6 डावांमध्ये नायरच्या बॅटमधून फक्त 65 धावा आल्या आहेत.
Published at : 05 May 2025 09:03 PM (IST)