Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2025 : मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वात महागडे 'हे' 5 खेळाडू, रिषभ पंतने तोडले सर्व रेकॉर्ड
गेल्यावर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या रिषभ पंतला मेगा ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जाएंटसनं 27 कोटींची बोली लावत संघात घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेकेआरला विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जनं 26.75 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतलं असून तो पंजाबचा कॅप्टन होऊ शकतो.
कोलकाता नाईट रायडर्सनं व्यंकटेश अय्यरला रिलीज केलं होतं मात्र मेगा ऑक्शनमध्ये त्याला 23.75 कोटी रुपयांना संघात स्थान दिलं.
पंजाब किंग्जनं अर्शदीप सिंगला रिटेन केलं नव्हतं, मात्र आज अर्शदीप सिंगला संघात घेण्याची इच्छा हैदराबादनं दर्शवल्यानंतर पंजाबनं 18 कोटी रुपयांना परत संघात घेतलं.
युजवेंद्र चहल याला देखील पंजाबनं खरेदी केलं आहे. पंजाबनं युजवेंद्र चहलवर 18 कोटी रुपयांची बोली लावली. तो यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता.
राजस्थान रॉयल्सचा आक्रमक खेळाडू जोस बटलर याचं देखील नशीब उजळलं आहे. गुजरात टायटन्सनं 18.75 कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात घेतलं.