IPL 2025 : आयपीएलचा उद्घाटन सोहळा अन् पहिल्या मॅचवर अनिश्चिततेचं सावट? मोठी अपडेट समोर
आयपीएलच्या 18 व्या सत्राला आजपासून ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवरून सुरुवात होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून कोणं चांगली सुरुवात करणार ते पाहावं लागेल.
Continues below advertisement
आयपीएलचा पहिला सामना संकटात
Continues below advertisement
1/5
आयपीएलच्या 18 व्या सत्राला आजपासून ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवरून सुरुवात होणार आहे.
2/5
18 व्या पर्वातील पहिला सामना हा गतविजेता कोलकत्ता नाईट रायडर्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरू या दोन संघात पार पडणार आहे.
3/5
हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळण्यात येणार आहे. त्यापूर्वी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी आणि लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल रंग भरणार आहे. मात्र, उद्घाटन सोहळा आणि पहिली मॅच यावर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे.
4/5
आयपीएलच्या यंदाच्या पहिला सामनाच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भारतीय हवामान विभागाने गुरुवार ते रविवार या कालावधीत दक्षिण बंगाल परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
5/5
केकेआर आणि आरसीबी यांच्यातील पहिल्या लढतीमध्ये अजिंक्य रहाणे केकेआरचं तर आरसीबीचं नेतृत्व रजत पाटीदार करेल. मात्र,या लढतीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून याशिवाय रविवारी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Published at : 22 Mar 2025 08:33 AM (IST)