Punjab Kings : पंजाब किंग्जसाठी गुड न्यूज, श्रेयस अय्यरचे चार शिलेदार भारतात परतणार, मुंबई-दिल्लीचं टेन्शन वाढणार
Punjab Kings : श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्जनं तब्बल 11 वर्षानंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबचे दोन सामने बाकी आहेत.
Continues below advertisement
पंजाब किंग्ज
Continues below advertisement
1/5
आयपीएल 2025 पुन्हा सुरु झालं आहे. पंजाब किंग्जचे चार शिलेदार पुन्हा भारतात परत येणार आहेत. यामुळं पंजाब किंग्जचा संघ भक्कम होईल.
2/5
पंजाब किंग्जचे चार शिलेदार मंगळवारी भारतात दाखल होतील. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार मार्कस स्टॉइनिस, जोस इंग्लिस, आरोन हार्डी, काईल जेमिसन मंगळवारी भारतात येतील.
3/5
हे सर्व खेळाडू पंजाब किंग्ज- दिल्ली कॅपिटल्स मॅचमध्ये सहभागी होऊ शकतात. पंजाब किंग्जची ताकद यामुळं वाढणार आहे. पंजाबचे चार शिलेदार परत आल्यानं मुंबई आणि दिल्ली विरुद्ध श्रेयस अय्यरचा संघ मजबूत झाला आहे. पंजाबच्या संघात हे खेळाडू दाखल होत असले तरी यापैकी स्टॉयनिसला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र, महत्त्वाच्या सामन्यात तो दमदार कामगिरी करु शकतो.
4/5
पंजाब किंग्जचे दोन सामने बाकी आहेत. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध या लढती होणार आहेत. 24 मे आणि 26 मे रोजी हे सामने होणार आहेत. त्यापूर्वी पंजाबच्या संघाला दिलासा मिळाला आहे.
5/5
श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्जनं 12 पैकी 8 सामने जिंकले होते. 17 गुणांसह पंजाब किंग्जनं आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. श्रेयस अय्यरनं तीन संघांना आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून दिला. 2024 चं आयपीएल विजेतेपद केकेआरला मिळवून दिलं.
Continues below advertisement
Published at : 20 May 2025 07:14 PM (IST)