MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीची चेपॉकवर गुगली, चेन्नईच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, माही नेमकं काय म्हणाला?

MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी यानं पुढच्या मॅचमध्ये खेळेन की नाही हे माहिती नाही, असं म्हटलं. चेन्नई विरुद्ध पंजाब मॅचवेळी टॉसनंतर धोनीनं हे वक्तव्य केलं.

महेंद्रसिंह धोनीची गुगली, चेन्नईच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं?

1/5
महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून निवृत्ती कधी घेणार यासंदर्भातील चर्चा सुरु असतात. धोनीनं देखील आतापर्यंत आयपीएलमधील निवृत्तीबद्दल स्पष्टपणे उत्तर दिलेलं नाही. चेन्नई विरुद्ध पंजाब मॅचच्या टॉसनंतर महेंद्रसिंह धोनीा प्रश्न विचारण्यात आले.
2/5
श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आयपीएल टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसन यानं धोनीला म्हटलं की चाहत्यांचा उत्साह पाहा, याचा अर्थ तुम्ही पुढच्या वर्षी देखील खेळण्यास येत आहात ना?
3/5
महेंद्रसिंह धोनीनं यावर स्मितहास्य करत उत्तर दिलं की सध्यातरी मला हे पण माहिती नाही की मी पुढील मॅच खेळणार आहे की नाही. धोनीच्या या वक्तव्यानं चेन्नईच्या चाहत्यांचं टेन्शन मात्र वाढलंय.
4/5
चेन्नईतील चेपॉकचं मैदान चेन्नई सुपर किंग्जचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईनं चेपॉकवर झालेल्या पाच पैकी केवळ एक मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर, चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
5/5
महेंद्रसिंह धोनीनं म्हटलं की तुम्ही जास्त सामने घरच्या मैदानावर खेळता. त्याचा होणारा फायदा महत्त्वाचा असतो. मात्र, आम्ही फायदा घेऊ शकलो नाही.आमची टीम अशी जी फार बदल करत नाही. मात्र, आम्ही या हंगामात अनेक बदल केले आहेत. याचा कारण थेट आहे, जेव्हा तुमचे बरेच खेळाडू चांगली कामगिरी करतात त्यावेळी 1 ते 2 खेळाडू बदलू शकता. मात्र, हा हंगाम आमच्यासाठी चांगला राहिला नाही.
Sponsored Links by Taboola