IPL 2025: आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणारे 5 गोलंदाज, जोफ्रा आर्चर 76 धावा देऊन अव्वल स्थानावर

IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामाच्या सुरुवातीलाच राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला.

IPL 2025

1/7
IPL 2025: आयपीएल 2025 च्या हंगामाच्या सुरुवातीलाच राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला. (Photo Credit- IPL)
2/7
जोफ्रा आर्चर आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला आहे.(Photo Credit- IPL)
3/7
आयपीएल 2025 च्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी जोफ्रा आर्चरला धू धू धुतले. आर्चरने त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये 76 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्यामुळे आर्चर आता आयपीएल सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला आहे.(Photo Credit- IPL)
4/7
आयपीएल सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. 24 एप्रिल 2024 रोजी गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 षटकांच्या स्पेलमध्ये 73 धावा दिल्या.(Photo Credit- IPL)
5/7
या यादीत बासिल थंपी तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याचा सर्वात महागडा स्पेल टाकला होता. 17 मे 2018 रोजी आरसीबी विरुद्ध त्याने 4 षटकांत 70 धावा दिल्या होत्या.(Photo Credit- IPL)
6/7
आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा स्पेल टाकणारा यश दयाल हा चौथा गोलंदाज आहे. 9 एप्रिल 2023 रोजी गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने 4 षटकांत 69 धावा दिल्या होत्या. (Photo Credit- IPL)
7/7
सर्वाधिक धावा देणाऱ्यांच्या यादीत पाचवा गोलंदाज रीस टॉपली आहे. 15 मे 2024 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याने 4 षटकांत 68 धावा दिल्या होत्या.(Photo Credit- IPL)
Sponsored Links by Taboola