Darshan Nalkande Profile : गुजरातकडून खेळणारा दर्शन नळकांडे आहे तरी कोण?
CSK vs GT Qualifier 1: क्वालिफायर १ या मोक्याच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने मोठा बदल केला. यश दयाल याच्या जागी विदर्भाच्या दर्शन नळकांडे याला संघात स्थान दिलेय.. यंदाच्या आयपीएलमध्ये दर्शन पहिलाच सामना खेळत आहे... मोक्याच्या सामन्यात दर्शन कशी कामगिरी करतोय... याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदर्शन नळकांडे याला २०१८ मध्ये पंजाब किंग्स संघाने विकत घतले होते.. पण त्याला प्लेईँग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. आज गुजरातच्या संघातून दर्शन याला खेळण्याची संधी मिळाली आहे.
विदर्भाचा वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडे याला गुजरात टायटन्सने २०२२ च्या लिलावात २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीत विकत घेतले होते. २०२२ च्या हंगामात गुजरातकडून दर्शन यान आयपीएलमध्ये पदार्पण केले.. गतवर्षी दर्शन याला दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. या दोन सामन्यात दोन विकेट घेतल्या होत्या.
नळकांडे याचा जन्म चार ऑक्टोबर १९९८ रोजी वर्ध्यात झाला. दर्शन विदर्भाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. २०१९ मध्ये दर्शन याने हिमाचलप्रदेशविरोधात विदर्भाकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलेय. आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दर्शन याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय.
दर्शनचे वडील सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला आहेत. तर वकील असलेली त्याची आई अकोला विधी महाविद्यालयात व्याख्याता आहे. हे कुटूंब अकोल्यातील जठारपेठ भागात राहते. दर्शन मूळचा वर्ध्याचा आहे.
दर्शनची चारवेळा आयपीएलमध्ये निवड झाली. मात्र, यावेळी गुजरात संघाकडून त्याने पदार्पण केले.
दर्शन हा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्येही आपले योगदान देतो. विशेषकरुन शेवटच्या शटकांमध्ये चांगली फलंदाजीही करतो. दर्शनने 'मुश्ताक अली टी - 20' स्पर्धेत चार चेंडूत चार बळी घेतले होते
दर्शनने 'मुश्ताक अली टी - 20' स्पर्धेत चार चेंडूत चार बळी घेतले होते. असा पराक्रम करणारा तो भारताचा दुसरा तर जगातला नववा गोलंदाज ठरला होता.
मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत दर्शननं 13 बळी घेत टॉप 5 मध्ये स्थान पटकावले. गेल्या तीन वर्षांपासून दर्शन मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेत टॉप 5 मध्ये आहे. या स्पर्धेत तीन वर्षांत दर्शनच्या नावावर 40 विकेट्सची नोंद.