पावसामुळे सामना रद्द, लखनौ-चेन्नईला 1-1 गुण
LSG vs CSK, Match Highlights : लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना पावसामुळे धूतला गेला आहे. सामना सुरु होण्याआधी आणि सामन्यामध्येही पावसाने हजेरी लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळे तासभर सामना उशीरा सुरु झाला होता. लखनौची फलंदाजी सुरु असताना अखेरच्या षटकात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबववा लागला. पण पावसाने थांबायचे नाव घेतले नाही.
थोड्यावेळानंतर पाऊस थांबण्याची चिन्हे दिसली.. त्यामुळे चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार आव्हान देण्यात आले. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. पंचांनी पाहणी करत सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. दोन्ही संघाला एक एक गुण देण्यात आले. एक एक गुण मिळाल्यामुळे दोन्ही संघांनी गुणतालिकेत झेप घेतली आहे. याचा फटका राजस्थानला बसला.
राजस्थान चौथ्या क्रमांकावर घसरले आहे. लखनौने 10 सामन्यात पाच विजयासह 11 गुण घेतले आहेत. तर चेन्नईचेही दहा सामन्यात 11 गुण झाले आहेत. चेन्नईने पाच विजय मिळवले आहेत.
दरम्यान, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
आयुष बडोनीच्या अर्धशतकाच्या बळावर लखनौने 19.2 षटकात सात बाद 125 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. आयुष बडोनी याने 33 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली.
चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत लखनौच्या फलंदाजांना तंबूत धाडले. रविंद्र जाडेजा, मोईन अली आणि महिश तिक्ष्णा यांनी पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. महिश तिक्ष्णा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा याने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. मोईन अली याने चार षटकात 13 धावा खर्च केल्या. महिश तिक्ष्णा याने चार षटकात 37 धावा दिल्या. रविंद्र जाडेजा याने तीन षटकात 11 धावा दिल्या. दीपक चाहर याने चार षटकात 41 धावा दिल्या.