IPL लिलावात ठरले झिरो, आता ठरतायेत हिरो.. खेळाडूंनी जिंकली सर्वांची मनं
ईशांत शर्मा यंदा दिल्लीच्या संघाचा भाग आहे. सुरुवातीला दिल्लीने ईशांतला संधी दिली नव्हती. पण अखेरच्या काही सामन्यात त्याला दिल्लीने संधी दिली. ईशांत शर्माने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. प्रत्येक सामन्यात ईशांत शर्माने विकेट घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंदीप शर्मा याला 2023 च्या लिलावात खरेदीदार मिळाला नव्हता. बदली खेळाडू म्हणून संदीप शर्मा याने राजस्थानच्या संघात स्थान मिळवले होते. आता संदीप शर्मा याने भेदक मारा करत सर्वांची मने जिंकली आहेत.
लखनौचा अमित मिश्रा मागील काही हंगामात अनसोल्ड राहिला होता.. 2023 च्या लिलावात त्याच्यावर लखनौने बोली लावली. आतापर्यंत लखनौने भेदक मारा केलाय.
अजिंक्य रहाणे याला चेन्नईने अवघ्य 50 लाख रुपयांत ताफ्यात घेतले होते. अजिंक्य रहाणे याने वादळी फलंदाजी करत 250 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडलाय. मधल्या फळीत अजिंक्य रहाणे चेन्नईसाठी धावांचा पाऊस पाडत आहे.
पीयूष चावला सध्या दमदार फॉर्मात आहे. लिवात चावलावर कुणीही बोली लावलाया तयार नव्हते. मुंबईने त्याला मूळ किंमतीत ताफ्यात घेतलेय. चावलाने मुंबईसाठी सर्वाधिक 19 विकेट घेतल्या आहेत. चावलापुढे इतर गोंलदाज फिके पडलेत.