Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेटमधील गब्बरची थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री? लवकरच पहिला चित्रपट प्रदर्शित होणार
shikhar dhawan (p.c. shikhar dhawan facebook)
1/10
पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
2/10
भारतीय संघाचा लाडका गब्बर आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
3/10
पिंक व्हिलाच्या रिपोर्टनुसार, धवन त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.
4/10
शिखर धवननं त्याच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंगही पूर्ण केलं आहे.
5/10
मात्र, या चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेलं नाही.
6/10
रिल्स बनवण्याची आवड असणारा शिखर कायम सर्वांचे मनोरंजन करत असतो.
7/10
त्यामुळे अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याची संधी मिळाल्यावर त्यानं लगेच होकार दिला.
8/10
निर्मात्यांना शिखर धवन देखील संबधित भूमिकेसाठी परफेक्ट वाटला.
9/10
हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांत झळकत आहे.
10/10
शिखर धवन गेल्या वर्षाच्या अखेरीस अक्षय कुमार स्टारर चित्रपट राम सेतूच्या सेटवर दिसला होता.
Published at : 18 May 2022 08:00 AM (IST)