Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK IPL Finals Record : आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नईची 9 वेळा फायनल्समध्ये धडक; धोनीचे धुरंधर आज उंचावणार का मानाचा चषक?
Chennai IPL Finals Record : आयपीएल 2021 (IPL 2021) च्या अंतिम सामन्यात आज चैन्नई आणि कोलकाता यांच्यात सामना रंगणार आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईचा संघ कोलकातावर मात करुन आयपीएल चषक उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे. धोनीचे धुरंधर आणि इयोन मोर्गनचे वॉरियर्स आज एकमेकांसोबत आयपीएलच्या मैदानात भिडणार आहेत. त्यामुळे आज आयपीएलच्या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यापूर्वी 2012 मध्ये कोलकाता आणि चेन्नई यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. ज्या सामन्यात गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात कोलकातानं आयपीएल चषकावर आपलं नाव कोरलं होतं. तर चेन्नईनं नवव्यांदा आयएलच्या अंतिम सामन्यात धडक दिली असून आतापर्यंत 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा चषक आपल्या नावे केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये चेन्नईनं अंतिम सामन्यात धडक दिली होती. त्यावेळी चेन्नई आणि राजस्थान यांच्यात आयपीएल ट्रॉफीसाठी लढत झाली होती. कर्णधार शेन वॉर्नच्या नेतृत्त्वात राजस्थानं चेन्नईवर मात करत आयपीएलचा अंतिम सामना जिंकला होता.
IPL 2010 मध्ये धोनीच्या संघानं पुन्हा एकदा अंतिम सामन्यात धडक दिली होती. दरम्यान, यंदा संघानं मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव करत आयपीएलचा किताब पटकावला. चेन्नईचा स्टार फलंदाज सुरेश रैनानं नाबाद 57 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
पुढच्या वर्षी म्हणजेच, 2011 मध्ये चेन्नईचा संघ पुन्हा एकदा अंतिम सामन्यात पोहोचला. यंदा त्यांचा सामना बंगळुरुसोबत झाला होता. धोनीच्या संघानं बंगळुरुचा 58 धावांनी पराभव करत दुसऱ्यांचा आयपीएलचा किताब पटकावला होता.
चेन्नईच्या संघानं 2012 मध्ये तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक दिली होती. दरम्यान, कोलकातानं चेन्नईचा पराभव करत चेन्नईचं विजयाची हॅट्रिक करण्याचं स्वप्न संपुष्टात आणलं होतं.
चेन्नईनं 2019 मध्ये आठव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक दिली होती. परंतु, या हायव्होल्टेज सामन्यात मुंबई इंडियन्सनं चेन्नईचा एका धावेनं पराभव करत आयपीएलचा किताब जिंकला होता.
2016 आणि 2017 मध्येही चेन्नई फारशी चांगली खेळी करु शकली नाही. अशातच 2018 मध्येही चेन्नईनं अंतिम सामन्यात धडक दिली होती. धोनीच्या संघानं हैदराबादचा 8 विकेट्सनी परभाव केला होता.
यंदाही चेन्नईनं अंतिम फेरित धडक दिली आहे. कर्णधार धोनीच्या नेतृत्त्वात यंदा पुन्हा एकदा चेन्नई आयपीएल चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज आहे.