Hardik Pandya-Tilak Verma: हार्दिक पांड्याने सांगितलेच नव्हते, 'या' दिग्गजचा निरोप अन् तिलक वर्मा रिटायर्ड आउट, सर्व चक्रावले!
Continues below advertisement
Hardik Pandya-Tilak Verma
Continues below advertisement
1/8
आयपीएल 2025 च्या हंगामात काल (5 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायट्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात सामना खेळवण्यात आला. (Image Credit- IPL 2025)
2/8
शेवटच्या षटकापर्यंत कोणता संघ विजयी होईल, हे निश्चित नव्हते. मात्र अखेर लखनौने 12 धावांनी मुंबईचा पराभव केला. (Image Credit- IPL 2025)
3/8
मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याला जबाबदार धरण्यात येत आहे. अखेरचं षटक असताना तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाल्याने हार्दिक पांड्यावर निशाणा साधण्यात येत आहे. (Image Credit- IPL 2025)
4/8
तिलक वर्मा मोठे फटके मारण्यास अपयशी ठरत होता. त्यामुळे 18 व्या षटकातील 5 चेंडू झाल्यानंतर तिलक वर्माला रिटायर्ड आउट करण्याचा निर्णय मुंबईने घेतला. तिलक वर्माला रिटायर्ड आउट करण्याचा हा निर्णय कर्णधार हार्दिक पांड्याने घेतल्याचे बोलले जात होते. मात्र आता खरं सत्य समोर आलं आहे. (Image Credit- IPL 2025)
5/8
तिलक वर्माला रिटायर्ड आउट करण्याचा निर्णय कोणाचा होता?, याबाबत माहिती समोर आली आहे. (Image Credit- IPL 2025)
Continues below advertisement
6/8
तिलक वर्माला रिटायर्ड आउट करण्याचा निर्णय मीच घेतला होता, हा निर्णय इतर कोणीही घेतला नाही, असं मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धन याने सामना संपल्यानंतर मान्य केलं आहे. (Image Credit- IPL 2025)
7/8
तिलक वर्माने काहीवेळ मैदानावर घालवल्याने तो मोठ फटके मारेल, असं आम्हाला वाटत होते, मात्र तो यामध्ये अपयशी ठरला, असं महेला जयवर्धनने सांगितले. (Image Credit- IPL 2025)
8/8
तिलक वर्मा मोठे फटके खेळण्यास अपयशी ठरत असल्याने मी त्याला रिटायर्ड आउट करण्याचा निर्णय घेतला, असं महेला जयवर्धनने सांगितले. (Image Credit- IPL 2025)
Published at : 05 Apr 2025 12:09 PM (IST)