CSK vs GT, Match Highlights : गुजरातचा चेन्नईवर दणदणीत विजय, शुभमन गिलची सलामी अन् राशिदचा फिनिशिंग टच

CSK vs GT, Match Highlights : शुभमन गिलच्या अर्धशतकानंतर राशिद खान याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला.

CSK vs GT, Match Highlights | IPL 2023

1/11
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने चेन्नईवर (Chennai Super Kings) पाच विकेट्सने विजय मिळवला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईचा गुजरातकडून पराभव झाला
2/11
या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या चेन्नईच्या संघाने 178 धावा केल्या. चेन्नईने उभारलेली धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातने 19.2 षटकांमध्ये धावांचं लक्ष्य गाठलं.
3/11
या सामन्याद्वारे चेन्नईच्या संघाला गुजरातविरुद्ध सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
4/11
शुभमन गिलच्या अर्धशतकानंतर राशिद खान याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला.
5/11
या पराभवानंतर चेन्नईचा 'कॅप्टन कूल' धोनी खूपच निराश दिसला. सामन्यानंतर धोनीनं या पराभवाचं खरं कारण सांगितलं आहे.
6/11
आयपीएलमध्ये (IPL 2023) गुजरातने सलग तिसऱ्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला आहे. गेल्या सीझनमध्ये (IPL 2022) गुजरातने चेन्नईचा दोन वेळा पराभव केला होता.
7/11
गुजरातचा सलामी फलंदाज शुभमन गिल याने 63 धावांची खेळी केली.चेन्नईचा इम्पॅक्ट प्लेअर तुषार देशपांडे याने गिल याला बाद केले. गिल याने 36 चेंडूत 63 धावांची खेळी केली.
8/11
चेन्नई आणि गुजरातच्या इम्पॉक्ट प्लेअरने आपला इम्पॅक्ट पाडला. चेन्नईकडून तुषार देशपांडे याने सेट झालेल्या गिल याला बाद केले.
9/11
गिल याने अर्धशतकी खेळी केली. तर गुजरातचा इम्पॅक्ट प्लेअर साई सुदर्शन याने 22 धावांची छोटेखानी खेळी केली. त्याने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागिदारी केली.
10/11
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या काही षटकात गुजरातने चेन्नईच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. दोन षटकात फक्त दोन धावा करता आल्या होत्या. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाड याने फटकेबाजी केली.
11/11
एका बाजूला विकेट पडत असताना मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ऋतुराज गायकवाड याने 9 षटकार आणि चार चौकार लगावले. अल्जारी जोसेफ याने ऋतुराजला बाद केले.
Sponsored Links by Taboola