Arjun Tendulkar, IPL 2023 : यंदा सचिन तेंडूलकरच्या 'लेका'ला आयपीएलमध्ये संधी मिळणार? अर्जुनच्या पदार्पणबाबत रोहित शर्मा म्हणाला...
आज आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ यंदाच्या मोसमातील त्यांच्या पहिला सामना खेळतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आयपीएलमध्ये (Arjun Tendulkar IPL Debut) पदार्पण करू शकतो.
आयपीएल (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक (MI Coach) मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी अर्जुन तेंडूलकरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्मानं म्हटलं आहे की, व्यवस्थापनाच्या नजरा अर्जुनवर आहेत आणि त्याला यावर्षी प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागील दोन हंगाम मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र, अद्यापही अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पण करता आलेलं नाही.
अर्जुन तेंडुलकर दोन्ही सीझन तो बेंचवर होता. त्यामुळे यंदा तरी अर्जुनला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळणार का? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक मार्क बाउचर यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, अर्जुनने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाज म्हणून त्याला संघात संधी दिली जाऊ शकते.
अर्जुन त्याच्या वडिलांप्रमाणे स्पिनर नाही, पण तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तसेच तो फलंदाजीही करू शकतो. पण संघ त्याच्यासाठी काय योजना आखतो हे पाहावं लागणार आहे.
आयपीएल सुरु होण्यापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला अर्जुनबाबत विचारल्यावर तो म्हणाला की, याबाबत अपेक्षा करू शकतो.
मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचरही उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की, अर्जुनने त्याच्या गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केलं आहे. त्यामुळे निश्चितपणे निवडीसाठी त्याचा विचार केला जाईल.