Asian Cup 2023: भारत सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी ठरला पात्र
भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. फिलीपिन्सविरुद्ध पॅलेस्टाईननं 4-0 नं विजय मिळवल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. भारत त्यांचा पुढचा सामना हाँगकाँगशी खेळणार आहे. या सामन्यात भारत पराभूत झाल्यानंतरही संघावर काही फरक पडणार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय फुटबॉल संघानं आतापर्यंत एकूण पाचव्यांदा या स्पर्धेत प्रवेश केलाय. तसेच, भारतीय संघ सलग दोन वेळा या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतानं 1964 मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर 1984, 2011 आणि 2019 च्या स्पर्धाही खेळल्या आहेत.
एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतानं कंबोडिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. भारतानं कंबोडियाविरुद्ध 2-0 असा विजय मिळवला. या सामन्यात सुनील छेत्रीने दोन्ही गोल केले. तर, अफगाणिस्ताविरुद्ध सामन्यात भारतानं 2-1 च्या फरकानं विजय मिळवला. या सामन्या सुनील छेत्री आणि सहल अब्दुल समद यांनी प्रत्येकी एक-एक गोल केले.
अफगाणिस्तानविरुद्ध दोन गोल करत सुनील छेत्रीनं नव्या विक्रमाला गवसणी घातली. या दोन गोलसह त्यानं 128 आंतरराष्ट्रीय सामन्यात 83 गोल केले. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोनं 189 सामन्यांमध्ये 117 गोल केले आहेत. तर, मेस्सीनं 162 सामन्यात 86 गोल केले आहेत. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सुनील छेत्रीचा मेस्सीला मागे टाकण्याचा प्रयत्न करेल.