Viswanathan Anand birthday : भारताचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद साजरा करतोय आपला 52 वा वाढदिवस
(Photo Tweeted By @vishy64theking)
1/8
भारताचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आज आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदवर वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Photo Tweeted By @vishy64theking)
2/8
विश्वनाथन आनंदाचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी तामिळनाडू येथील मयिलाडूथराई या शहरात झाला. परंतु, त्याचं संपूर्ण बालपण मात्र चेन्नईतच गेलं. त्याचे वडील विश्वनाथन अय्यर दक्षिण रेल्वेत मैनेजर म्हणून कार्यरत होते. तर आई सुशीला देवी बुद्धिबळ प्रशिक्षक आणि प्रभावी समाज सुधारक होत्या. आईमुळेच आनंद बुद्धीबळाकडे आकर्षिला गेला. (Photo Tweeted By @vishy64theking)
3/8
विश्वनाथन आनंद हा एक अद्भुत प्रतिभेचा बुद्धिबळपटू आहे. चाणाक्ष खेळाडू म्हणून त्याची जगभरात ओळख आहे. आपल्या एका खेळीने तो बुद्धिबळाची बाजी पलटवून प्रतिस्पर्ध्यावर दबाव वाढवून त्याला चूक करण्यास भाग पाडतो. म्हणूनच त्याला बुद्धिबळाचा शहंशहा आणि बुद्धिबळाचा जादुगार म्हंटले जाते. (Photo Tweeted By @vishy64theking)
4/8
बुध्दिबळ प्रशिक्षण असलेल्या आईने विश्वनाथन आनंदला अवघ्या 6 व्या वर्षापासून बुद्धिबळाचे धडे दिले. विश्वनाथन आनंदला एक मोठा शिवकुमार नावाच भाऊ आणि अनुराधा एक बहिण आहे. विश्वनाथन आनंदने आपले सुरुवातीचे शिक्षण चेन्नईच्या एग्मोरे येथील डॉन बॉस्को मैट्रीक्यूलेशन हायर सेकंडरी स्कूल मधून पूर्ण केलं व कॉमर्स विषयाची पदवी चेन्नई येथीलच लोयोला कॉलेज मधून पूर्ण केली.(Photo Tweeted By @vishy64theking)
5/8
बुद्धिबळातील सर्व प्रकारात जिंकलेला आनंद हा एकमेव खेळाडू आहे. चार वेळा जगज्जेता, पाच वेळा बुद्धिबळातील ऑस्कर विजेता, सर्वात कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम करणारा आनंद गेल्या तीन दशकांपासून बुद्धिबळाचा राजा आहे. (Photo Tweeted By @vishy64theking)
6/8
विश्वनाथन आनंदच्या नावे अनेक विक्रम आहेत. 1983 मध्ये 9 पैकी 9 गुण घेत तो कनिष्ठ गटाचा राष्ट्रीय विजेता बनला. पंधराव्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय मास्टर' बनला. हा विक्रम करणारा आशियातील तो एकमेव खेळाडू आहे. सोळाव्या वर्षीच म्हणजे 1986 मध्ये ‘राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा’ जिंकली. 1987 मध्ये फिलिपाईन्समध्ये जागतिक ज्युनिअर चॅम्पियनशिप जिंकणारा तो पहिला आशियाई खेळाडू ठरला. 1987 मध्ये ग्रॅण्डमास्टर बनणारा तो एकमेव भारतीय होता. (Photo Tweeted By @vishy64theking)
7/8
विश्वनााथन आनंदला आतपर्यंत अनेक पुरस्कारानै सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये भारत सरकारचा खेळ पुरस्कार - अर्जुन अवॉर्ड (1985), पद्मश्री (1987), पद्मभूषण (2000) आणि पद्मविभूषण (2007) हे पुरस्कार दिले आहेत.(Photo Tweeted By @vishy64theking)
8/8
भारत सरकारचा सर्वोच्च खेळ पुरस्कार - राजीव गांधी खेळ रत्न (1991-1992) मिळणारा आनंद हा पहिला खेळाडू आहे. स्पेन सरकारचा सर्वोच्च पुरस्कार - Jameo de Oro (25 एप्रिल 2001). चेस ऑस्कर - सहा वेळा (1997, 1998, 2003, 2004, 2007, 2008 आणि 2009). (Photo Tweeted By @vishy64theking)
Published at : 11 Dec 2021 05:44 PM (IST)