Abhishek Sharma: जेवढी चर्चा कोहलीच्या शतकाची,तेवढीच अभिषेक शर्माच्या शर्टची,सव्वा लाखाचा शर्ट घालून पठ्ठया मैदानात !

विराट कोहलीनं नाबाद 100 धावा करत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयामुळं भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालं आहे.

Abhishek Sharma

1/7
दुबईमध्ये रविवारी रंगलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहणे एक वेगळाच अनुभव होता .
2/7
या सामन्यासाठी दुबईमध्ये अनेक सिनेमेगास्टार्सच्या हजेरीने सामना आणखी खास बनला .
3/7
कोहलीच्या शतकाची जेवढी चर्चा काल रंगली तेवढीच t20 मधला सलामीवीर अभिषेक शर्माच्या शर्टची होती.
4/7
रविवारी रंगलेल्या इंडिया VS पाकिस्तानच्या मॅचमध्ये चाहत्यांच्या गर्दीत अभिषेक शर्मा त्याच्या अनोख्या शर्टमुळे चांगलाच चर्चेत आला .
5/7
हा शर्ट अभिषेक शर्माला छान तर दिसतच होता . हा शर्ट 'कॅसाब्लँका ' या महागड्या ब्रँडचा शर्ट असल्याचा सांगितलं जातंय .
6/7
1409 डॉलर्स एवढ्या किमतीचा हा फ्लोरी सिल्क टी-शर्ट असून भारतीय रुपयांमध्ये या शर्टाची किंमत तब्बल सव्वा लाख ( 1,22000 ) रुपये आहे .
7/7
सोशल मीडियावर अभिषेक शर्माचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्याच्यासोबत अनेक सेलिब्रेटींच्या सेल्फी दिसत आहेत.
Sponsored Links by Taboola