IND vs ENG : पहिल्या पराभवाचा वचपा काढला! अश्विन, रोहित, अक्षर विजयाचे शिल्पकार
सर्व फोटो- BCCI च्या ट्विटरवरुन...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताकडून पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने 60 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. याशिवाय आर अश्विन तीन विकेट घेण्यास यशस्वी झाला आणि कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या.
काल तिसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 53 धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. चौथ्या दिवशी इंग्लंड दोन सेशनही खेळू शकला नाही.
इंग्लंडकडून दुसर्या डावात मोईन अलीने 18 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 43 धावा केल्या. कर्णधार जो रूटने 92 चेंडूत 33 धावा केल्या. डॅनियल लॉरेन्स 26, रोरी बर्न्सने 25, ओली पोपने 12 धावा केल्या.
चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडला आर अश्विनच्या शतकाच्या आणि 8 विकेट्सच्या जोरावर पराभूत केलं.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला. भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
या सामन्याचा खरा हिरो आणि मॅन ऑफ द मॅच. आर अश्विन. पहिल्या डावात अश्विननं पाच तर दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या.
या विजयाचा पाया रचला रोहित शर्मानं. त्यानं पहिल्या डावात शानदार शतक करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -