PHOTO : टीम इंडियाची पोरं कमाल! इंग्लंडला धूळ चारत पाचव्यांदा रचला इतिहास

ICC U19 World Cup 2022 Final

1/8
अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला 4 विकेट्सनं पराभूत केलंय.
2/8
या विजयासह भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरलंय.
3/8
या शानदार विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
4/8
संघातील प्रत्येक खेळाडूंना प्रत्येकी 40 लाखांचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे
5/8
तर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.
6/8
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगलट आला.
7/8
भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ 189 धावांत आटोपला.
8/8
उपकर्णधार शेख रशिद आणि निशांत संधूच्या अर्धशतकाच्या जोरावर संघानं विश्वचषकावर शिक्कामोर्तब केलं. (सर्व फोटो BCCI च्या ट्वीटरवरुन)
Sponsored Links by Taboola