In Pics : घड्याळ जप्तीवर हार्दिक पांड्यानं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...
Hardik Pandya News : युएईवरुन परतलेल्या हार्दिक पांड्याकडून कस्टम विभागाने सोमवारी दोन घड्याळं जप्त केली होती . यावर हार्दिक पांड्यानं स्पष्टीकरण दिलं आहे... (photo: hardikpandya93/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमवारी युएईतून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्याची दोन घड्याळं मुंबई कस्टम विभागानं जप्त केली होती. या घडाळाची किंमत पाच कोटी असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. यावरुन हार्दिक पांड्या यानं ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. (photo: hardikpandya93/ig)
हार्दिक पांड्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क कांऊटर मी स्वत:गेलो होतो. तिथे सोबत आणलेल्या सामानाची माहिती आणि सीमाशुल्क भरण्यासाठी गेलो होतो. (photo: hardikpandya93/ig)
कस्टम विभागानं ताब्यात घेतलेल्या दोन घड्याळांची किंमत सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये पाच कोटी असल्याचं सांगितलं जातेय. मात्र, या घड्याळाची किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. : हार्दिक पांड्या (photo: hardikpandya93/ig)
सोमवारी हार्दिक पांड्या यूएईमधून मुंबईत परतला. विमानतळावर पोहचल्यानंतर कस्टमनं हार्दिक पांड्याची 5 कोटी रुपयांच्या किंमतीची 2 घड्याळं ताब्यात घेतली आहे. हार्दिक पांड्याकडे या घड्याळाचे इनवॉइस नव्हते. तसंच त्यानं या घड्याळांची कोणताही माहिती दिली नसल्याचं मुंबई कस्टम विभागानं सांगितलं. (photo: hardikpandya93/ig)
यूएईमध्ये झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत भारतीय संघ साखळी स्पर्धेतून बाहेर पडला. (photo: hardikpandya93/ig)
हार्दिक पांड्या मायदेशात परत असताना त्याच्याकडं महागडी घड्याळ सापडल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. टी-20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याकडं ही घड्याळं कशी आली? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. (photo: hardikpandya93/ig)