In Pics : विश्वचषक विजयाच्या स्वप्नपूर्तीनंतर ट्रॉफी कुशीत घेऊन झोपला मेस्सी, इन्स्टावर शेअर केले खास फोटो

अत्यंत रोमहर्षक सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा (FRA vs ARG) विजय करत फिफा विश्वचषक 2022 जिंकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अर्जेंटिनाने विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला आणि संघाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीला अखेर वर्ल्ड कप मिळाला.

35 वर्षीय मेस्सीनं फुटबॉल कारकिर्दीत अनेक मोठ-मोठे पुरस्कार मिळवले पण विश्वचषक न मिळाल्या खंत त्याच्या मनात होती, जी अखेर पूर्ण झाली.
मेस्सीचं एक मोठं स्वप्न मेस्सीचं पूर्ण झालं. ज्यामुळे विजयानंतर झोपताना देखील मेस्सीने ट्रॉफी सोडली नसून ट्रॉफी कुशीत घेऊनच तो झोपला.
मेस्सीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये मेस्सीनं शुभ दिवस लिहिलं असून सोबत ट्रॉफी बरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
या पोस्टवर जगभरातील मेस्सी चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
फुटबॉल जगतातील अनेकांनी मेस्सीवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दरम्यान सद्यस्थितीला जगभरातील मेस्सी फॅन कमालीचे आनंदी आहेत. मेस्सी फॅन्सनी विजयानंतरही कमाल असा जल्लोष केला.
विशेष म्हणजे मेस्सीसह अर्जेंटिनाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल कामगिरी केल्यामुळे हा विश्वचषक ते जिंकू शकले.