अर्जेंटिना जगज्जेता पण फ्रान्सचीही कडवी झुंज
Fifa World cup final 2022: संपूर्णपणे मेसीमय झालेल्या कतारच्या लुसेल स्डेटियमवर इतिहास घडलाय. कारण, तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनानं फिफा विश्वचषकावर नाव कोरलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी दोन-दोन गोल केले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळात गेला. त्यात मेसीच्या जादुई गोलच्या जोरावर अर्जेंटिनानं तगड्या फ्रान्सला 3-2 अशा गोलफरकानं मागे टाकलं.
118 मिनिटाला किलियन एम्बापे नावाचं वादळं पुन्हा धडकलं. आणि फ्रान्सनं तिसरा गोल डागला. त्यामुळे निर्धारित वेळ संपली आणि सामना पेनेल्टी शूटआऊटवर गेला.
आणि त्याच पेनेल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा फरकानं आर्जेंटिनानं फ्रान्सवर विजय मिळवला. त्यात फ्रान्सकडून किलियन एम्बापेनं पहिला गोल केला. फ्रान्सला आघाडीवर नेल. पण त्यानंतर फ्रान्सच्या दोन खेळाडूंना गोल करता आला नाही. दुसरीकडे मेसीसेनेनं सलग तीन गोल केले होते. आणि पेनेल्टी शूटआऊटवर आपला ताबा मिळवला होता. चौथी किक फ्रान्सच्या रान्डाल कोलो माओनीनं मारली, गोलही केला. त्यानंतर अर्जेंटिनाच्या गोन्झालो मॉन्टिएलनं गोल केला आणि विश्वचषकावर नाव कोरलं.
विश्वचषकात याआधीही पेनेल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनानेच विजय मिळवला होता. आणि त्याचा शिल्पकार ठरला होता गोलकीपर इमिलियानो मार्टिनेझ.
१९८६ साली दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने शेवटचा विश्वचषक जिंकला होता.
१९७८ सालीही अर्जेंटिनानं विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर अर्जेंटिनाला ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. दुसरीकडे, फ्रान्सने १९९८ आणि २०१८ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता.