CWG 2022 Closing Ceremony : पंजाबी ढोलाच्या ठेक्यावर थिरकलं बर्मिंगहम, फोटोंमध्ये पाहा क्लोजिंग सेरेमनीतील खास क्षण
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये नुकतेच कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेचा क्लोजिंग सेरेमनी पार पडला. यावेळी पंजाबी भांगडा डान्सने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी भारताचे ध्वजवाहक म्हणून स्पर्धेत सुवर्णकामगिरी करणारे शरथ कमल आणि निकहत झरीन हे दोघे होते.
यावेळी विविध नृत्यप्रकार सादर करण्यात आले, पण भारताचा प्रसिद्ध असा पंजाबी ढोलवरील भांगडा डान्स सर्वांचच लक्ष वेधणारा ठरला.
भारतीय डान्ससह विविध प्रकारचे वेस्टर्न डान्सही यावेळी पाहायला मिळाले. विविध जगविख्यात कलाकारांनी यावेळी परफॉर्मन्स सादर केला.
यंदा भारत स्पर्धेच्या अखेरीस चौथ्या स्थानी राहिला असून भारताने एकूण 61 पदकांवर यंदा नाव कोरलं. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता.
यंदा ऑस्ट्रेलिया 178 तर इंग्लंड 176 पदकांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिले. तर 92 पदकांसह कॅनडा तिसऱ्या स्थानावर होता.