In Pics : रोनाल्डो, मेस्सी उतरले मैदानात, रंगतदार सामन्यात मेस्सीचा संघ 5-4 ने विजयी
Ronaldo vs Messi Match : सौदी अरेबियात रियाद 11 विरुद्ध पॅरिस सेंट जर्मन (PSG) फुटबॉल क्लब यांच्यातील सामन्यात पीएसजी संघाने 5-4 च्या फरकाने बाजी मारली.
Ronaldo vs Messi
1/10
फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी पुन्हा एकदा उतरले होते मैदानात.
2/10
19 जानेवारी रोजी झालेल्या सौदी अरेबियातील रियाध शहरात दोघे एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले.
3/10
सामना अगदी अटीतटीचा झाला होता. रोनाल्डोने अगदी दमदार खेळ दाखवला.
4/10
रोनाल्डोने सामन्यात दमदार असे दोन गोल करत संघाकडून सर्वात उत्तम खेळ केला.
5/10
पण अखेर मेस्सीच्या संघाने 5 गोल केल्याने रोनाल्डोचा संघ 5-4 च्या फरकाने पराभूत झाला.
6/10
यावेळी मेस्सी त्याचा संघ पॅरिस सेंट जर्मन (PSG) फुटबॉल क्लबकडून खेळला. तर रोनाल्डो सौदी अरेबियातील दमदार खेळाडूंना घेऊन तयार केलेल्या रियाध ऑलस्टार 11 संघाचा कर्णधार होता.
7/10
सौदी अरेबियातील रियाध शहरात खेळल्या गेलेल्या सामन्यात रोनाल्डो-मेस्सी बऱ्याच काळानंतर आमने-सामने आले होते.
8/10
अगदी अटीतटीच्या झालेल्या सामन्यात मेस्सी, रोनाल्डो आणि एमबाप्पे या स्टार्स खेळाडूंनीही गोल केले.
9/10
हा सामना पाहण्यासाठी रियाधचे स्टेडियम पूर्णपणे हाऊसफुल्ल झाले होते. मेस्सी आणि रोनाल्डोला समोरासमोर पाहण्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
10/10
हे दोन्ही दिग्गज स्टेडियममध्ये दाखल झाले तेव्हा तेथील वातावरण पाहण्यासारखे होते. या मोठ्या खेळाडूंनी बॅक टू बॅक गोल केल्याने चाहत्यांची मजा आणखीच वाढली होती.
Published at : 20 Jan 2023 05:55 PM (IST)