Steve Smith : स्मिथचे भारताविरुद्ध नववे कसोटी शतक, रुटची केली बरोबरी
IND vs AUS WTC Final 2023, Steven Smith : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव स्मिथ याने चिवट फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा घामटा काढला. संयमी फलंदाजी करत स्मिथ याने शतकी खेळी केली. स्मिथने पहिल्या दिवसी 95 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर आक्रमक रुप घेत शतकाला गवसणी घातली. स्मिथ याने 268 चेंडूत 121 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार लगावले. लॉर्ड शार्दूल ठाकूर याने स्मिथ याला बाद करत भारताला मोठं यश मिळवून दिले. पण त्यापूर्वी स्मिथने आपले काम पूर्ण केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टिव्ह स्मिथ याने भारताविरोधात नववे शतक झळकावत नव्या विक्रमाला गवसणी घातली. भारताविरोधात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजात तो जो रुटसोबत पहिल्या क्रमांकावर पोहचलाय.
भारताविरोधात जो रुट आणि स्मिथ यांनी प्रत्येकी नऊ नऊ शतके झळकावली आहेत. रिकी पाँटिंग, गॅरी सोबर्स आणि विव रिचर्ड्स यांनी भारताविरोधात प्रत्येकी आठ आठ शतके झळकावली आहेत.
स्मिथ याने शानदार शतक झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉल यांना पछाडले.
फॅब 4 म्हणून ओळखले जाणारे विराट, स्मिथ, रुट आणि विल्यमसन यांच्यामध्ये सर्वाधिक शतकांची स्पर्धा रंगली आहे. कसोटीत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत स्मिथ याने मोठी झेप घेतली आहे. विराट कोहली यामध्ये मागे पडलाय. विराट कोहली याच्या नावावर 28 शतके आहेत. तर स्मिथ 31 शतकासह आघाडीवर आहेत.