दिवाळीचा आनंद द्विगुणित, भारतानं नेदरलँड्सचा 160 धावांनी उडवला धुव्वा
भारतानं नेदरलँड्सचा 160 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला.
Cricket World Cup 2023
1/6
भारताचा हा नऊ सामन्यांमधला नववा विजय ठरला.
2/6
या विजयासह रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांना देशवासीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
3/6
या सामन्यात भारतानं दिलेल्या 411 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सनं 47 षटकं आणि पाच चेंडूंत सर्व बाद 150 धावांची मजल मारली.
4/6
भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
5/6
विराट कोहली आणि रोहित शर्मानंही प्रत्येकी एकेक विकेट घेऊन आपली उपयुक्तता सिद्ध केली.
6/6
यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया अजेय राहिली आहे. भारताने सलग नवव्या विजयाची नोंद केली. अखेरच्या साखळी सामन्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.
Published at : 12 Nov 2023 10:06 PM (IST)