Ind vs Eng 5th Test : ओव्हल कसोटीत असं काय घडलं? मोहम्मद सिराजला मैदानाच्या मध्येच मागावी लागली माफी; फोटो व्हायरल

Ind vs Eng 5th Test : ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

mohammed siraj apologized prasidh krishna

1/8
ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
2/8
इंग्लंडचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, एकदा मोहम्मद सिराज हजारो चाहत्यांसमोर सहकारी गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची माफी मागताना दिसला.
3/8
ओव्हल कसोटीत असं काय घडलं की सिराज माफी मागताना दिसला?
4/8
खरंतर झालं असं की, इंग्लंडच्या डावाचा 35 वा षटक प्रसिद्ध कृष्णा टाकत होता.
5/8
पहिल्या चेंडूवर हॅरी ब्रूकने पुल शॉट खेळला, पण चेंडू बॅटला टॉप एज लागून थेट सीमारेषेच्या दिशेने गेला.
6/8
मोहम्मद सिराज तिथे उपस्थित होता आणि त्याने उत्तम झेल पकडला.
7/8
मात्र झेल घेताना त्याच्या पायाचा स्पर्श बाउंड्री रोपला झाला आणि त्यामुळे तो झेल बाद ठरला नाही. त्यावेळी ब्रूक फक्त 19 धावांवर फलंदाजी करत होता.
8/8
त्यानंतर, सिराज कृष्णाकडे गेला आणि माफी मागितली. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sponsored Links by Taboola