Virat Kohli Vijay Hazare Trophy : बंगळुरुमध्ये विराट कोहली खेळणार, पण प्रेक्षकांना नो एन्ट्री; संपूर्ण चिन्नास्वामी स्टेडियम असणार रिकामी, धक्कादायक कारण समोर
No Entry For Fans Virat Kohli Vijay Hazare Trophy Match : बंगळुरु येथे दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांच्यात होणारा विजय हजारे ट्रॉफीचा सामना चर्चेचा विषय ठरत आहे.
Continues below advertisement
No Entry For Fans Virat Kohli Vijay Hazare Trophy Match
Continues below advertisement
1/11
बंगळुरु येथे दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांच्यात होणारा विजय हजारे ट्रॉफीचा सामना चर्चेचा विषय ठरत आहे.
2/11
कारण या सामन्यात विराट कोहली दिल्ली संघाकडून खेळणार आहे.
3/11
मात्र, चाहत्यांसाठी मोठी निराशाजनक बातमी म्हणजे हा सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे.
4/11
ESPN च्या रिपोर्टनुसार, कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेला (KSCA) आदेश दिले आहेत की दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश हा सामना प्रेक्षकांविना चिन्नास्वामी स्टेडियममध्येच खेळवावा.
5/11
सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Continues below advertisement
6/11
दरम्यान, बीसीसीआयचे सेंटर ऑफ एक्सीलेंस हे बॅक-अप मैदान म्हणून तयार ठेवण्यात आले आहे.
7/11
जर पुढील सामन्यांसाठी चिन्नास्वामी स्टेडियमला पोलिसांची परवानगी मिळाली नाही, तर ते सामने तिथे हलवले जाऊ शकतात.
8/11
मुळात दिल्ली आणि आंध्र प्रदेश यांच्यातील हा सामना अलूर येथे होणार होता. मात्र विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोन सुपरस्टार खेळाडूंची उपलब्धता पाहता सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर हलवण्यात आला.
9/11
ESPN क्रिकइन्फोच्या मते, विराट आणि पंत यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता होती. पुन्हा कोणतीही चेंगराचेंगरी किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठीच कर्नाटक सरकारने प्रेक्षकांविना सामना घेण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
10/11
आयपीएल 2025 मध्ये आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरुमध्ये काढण्यात आलेल्या विक्ट्री परेडदरम्यान 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
11/11
त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या क्रिकेट सामन्यांना अद्याप परवानगी मिळालेली नाही.
Published at : 23 Dec 2025 01:25 PM (IST)