Omkar Tarmale SRH IPL 2026 : शेरेगावचा शेर, मराठमोळ्या ओंकारचं नॉर्मल स्पीड 140, बचत गटातून कर्ज घेऊन ट्रेनिंग, आता IPL गाजवणार!
Who is Onkar Tarmale SRH IPL News : आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये अनेक बड्या खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लागल्या.
Continues below advertisement
Who is Onkar Tarmale SRH IPL 2025
Continues below advertisement
1/11
आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये अनेक बड्या खेळाडूंवर कोट्यवधींच्या बोली लागल्या.
2/11
पण या झगमगाटात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या एका तरुणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
3/11
शहापूर तालुक्यातील शेरेगावचा 21 वर्षांचा वेगवान गोलंदाज ओंकार तारमळे याची सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने निवड केली आहे.
4/11
सनरायझर्स हैदराबादने ओंकारला 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर आपल्या संघात सामील करून घेतलं.
5/11
मराठमोळ्या ओंकारचा नॉर्मल बॉलिंग स्पीड तब्बल 140 किमी प्रतितास आहे. त्याच्या वेगाने आणि आत्मविश्वासाने स्काऊट्सही प्रभावित झाले.
Continues below advertisement
6/11
ओंकारचा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील तुकाराम तारमळे शेतकरी असून शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
7/11
मोठ्या शहरांमध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी आणि दिल्ली, त्रिपुरा येथे सामने खेळण्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नव्हता. तरीही मुलाचं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी कुटुंबाने हार मानली नाही.
8/11
ओंकारचे वडील तुकाराम तारमळे म्हणाले, “आमची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की, मी माझ्या मुलाच्या स्वप्नांना पंख देऊ शकेन. त्याला बाहेर खेळायला पाठवण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. शेवटी बचत गटातून 3 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. आज त्याची मेहनत रंगाला आली आणि देवाने त्याला त्याचं फळ दिलं.”
9/11
बचत गटाच्या कर्जातून सुरू झालेला हा संघर्ष आज आयपीएलपर्यंत पोहोचला आहे.
10/11
शेरेगावचा हा शेर आता देशातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
11/11
आयपीएल 2026 च्या हंगामात ओंकार तारमळे आपल्या वेगवान गोलंदाजीने सनरायझर्स हैदराबादसाठी काय कमाल करतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
Published at : 18 Dec 2025 01:28 PM (IST)