In Pics : किंग कोहली दमदार फॉर्मात, सलग दुसरी एकदिवसीय सेन्चूरी ठोकत 73 शतकं केली पूर्ण
IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली याने 113 धावांची दमदार खेळी करत लागोपाठ दुसरं एकदिवसीय शतक ठोकलं आहे.
Virat Kohli
1/10
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.
2/10
त्याने 91 चेंडूत 113 धावांची दमदार खेळी केली.
3/10
त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
4/10
या शतकासह त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 73 वे शतक पूर्ण केले आहे.
5/10
याआधी त्याने बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावले होते.
6/10
ज्यामुळे त्याने सलग दोन सामन्यात शतक झळकावत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
7/10
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12, 500 धावांचा टप्पा पार करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरला आहे.
8/10
याशिवाय त्याने वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक त्याने झळकावले. त्याचवेळी घरच्या मैदानावर त्याचे हे 20 वे आंतरराष्ट्रीय शतक होते.
9/10
या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक शतके झळकावणारा कोहली हा दुसरा फलंदाज आहे.
10/10
त्याच्यासाठी 2023 वर्षाची सुरुवात चांगली झाली असून वर्षातील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावल्याने आता वर्षभरात आणखी शतकं ठोकेल अशी आशा आहे
Published at : 10 Jan 2023 10:11 PM (IST)