Team India : श्रीलंकेविरुद्ध विजयामुळे भारतीय संघासह खेळाडूंची अनेक रेकॉर्ड्सना गवसणी
भारतानं श्रीलंकेला दुसऱ्या कसोटीत 238 धावांनी मात देत मालिकाही 2-0 ने खिशात घातली आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीत भारताचा हा सलग 15 वा मालिका विजय ठरला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे या विजयासह भारतीय टीमने आणि त्यातील खेळाडूंनी नवनव्या रेकॉर्ड्सना गवसणी घातली आहे.
यात कर्णधार रोहितचा कर्णधार झाल्यापासून भारताचा हा सलग 14 वा आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजय आहे. तर पाचवा मालिका विजय आहे. विशेष म्हणजे या साऱ्या मालिकेत भारताने प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश दिला आहे.
रोहितसह संघातील इतरही खेळाडूंनी काही खास रेकॉर्ड्स केले आहेच.
या मालिकेत श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी उल्लेखणीय कामगिरी केली.
यात श्रेयसने पहिल्या डावात 92 आणि दुसऱ्या डावात 67 धावा करत अप्रतिम दोन्ही डावात अर्धशतक झळकावली. त्यामुळे अय्यर डे-नाइट टेस्ट मॅचच्या दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे.
तर पंतने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावत भारताकडून सर्वात जलदगतीने कसोटी अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नावे केला.
आश्विननेही मालिकेत उत्तम कामगिरी केली. त्यात दुसऱ्या कसोटीत त्याने 440वा कसोटी विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनच्या 439 विकेट्सचा रेकॉर्डला मागे टाकले आहे.