Team India : वर्ल्ड कपच्या पहिल्या तीन मॅचमधून मोठे संकेत... टीम इंडियाचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार, पाकिस्तानला महागात पडणार
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अ गटात आहे. भारताच्या गटात पाकिस्तानचा संघ देखील आहे. भारतानं सराव सामन्यात बांगलादेशला 60 धावांनी पराभूत केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये तीन मॅच झाल्या आहेत. यापैकी दुसरी आणि तिसरी मॅच महत्त्वाची ठरली. या दोन्ही मॅचेसमध्ये मोठी धावसंख्या झालेली नाही. दुसरी आणि तिसरी मॅच गयाना आणि बारबाडोसमध्ये झाली होती. सेमी फायनल आणि फायनलच्या मॅचेस या ठिकाणी होणार आहेत.
भारतीय क्रिकेट संघानं चार फिरकीपटूंना 15 जणांच्या संघात स्थान दिलेलं आहे. युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान दिलेलं आहे.
चहलनं आयपीएल 2024 च्या 17 व्या पर्वात चांगली कामगिरी केली होती. जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलनं देखील चांगली कामगिरी केली आहे.
वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यांची स्थिती पाहता भारताचे चार स्पिनर्स गेमचेंजर ठरु शकतात. चहल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव पाकिस्तानसाठी धोकादायक ठरु शकतात.