T20 World Cup 2024 Ind vs Pak: कधी पाकिस्तानच्या, तर कधी भारताच्या बाजूने...; थरारक सामन्याची A to Z स्टोरी, एका क्लिकवर
कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताने शानदार खेळ करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 धावांनी नमवले. यासह टी-20 विश्वचषकात भारताने सातव्यांदा पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. (Image Credit- BCCI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताचा डाव 19 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. यानंतर भारतीयांनी पाकला 20 षटकांत 7 बाद 113 धावांवर रोखले. (Image Credit- BCCI)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत अवघ्या 119 धावांवर ऑलआऊट झाला. (Image Credit- BCCI)
भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. पंतने 31 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. अक्षर पटेलने 20 धावा केल्या, पण अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. (Image Credit- BCCI)
पाकिस्तान जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करायला उतरला तेव्हा बाबर आझम फक्त 13 धावा करून लवकर बाद झाला. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानने 44 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.(Image Credit- BCCI)
पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. बाबर आझमच्या संघाला 48 चेंडूत 48 धावा करायच्या होत्या, 8 फलंदाज उरले होते, पण यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. (Image Credit- BCCI)
टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. त्यामुळे पाकिस्तानी संघ हा सामना 6 धावांनी हरला. हार्दिक पांड्या भारताकडून 13 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात हार्दिक पांड्याने महत्त्वाची विकेट घेतली ती म्हणजे फखार जमानची. (Image Credit- BCCI)
फखार जमानच्या विकेट्सने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. फखार जमान टी-20 मधील महत्वाचा फलंदाज होता. तसेच फखारने भारताविरुद्ध याआधी देखील चांगल्या धावा केल्या आहेत. पण हार्दिकने फखारची घेतलेली विकेट सामन्यातील टर्निग पॉइंट ठरला. (Image Credit- BCCI)
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. (Image Credit- BCCI)
2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे. (Image Credit- BCCI)
विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?- आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आमच्या डावात आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मात्र आम्ही पुरेशी भागीदारी केली नाही आणि फलंदाजीत कमी पडलो. (Image Credit- BCCI)
गेल्या सामन्याच्या तुलनेत चांगली विकेट होती. आम्ही जेव्हा फलंदाजी करुन गोलंदाजीसाठी मैदानात उतरलो तेव्हा आम्ही विचार केला की आपल्या विकेट्स जाऊ शकतात, तर त्यांच्या पण विकेट्स आपण घेऊ शकतो. प्रत्येकाकडून थोडेसे योगदान मोठे फरक करू शकते. (Image Credit- BCCI)
बुमराह एक ताकदवान खेळाडू आहे. तो काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. संपूर्ण विश्वचषकामध्ये त्याने त्या मानसिकतेत राहावे, असं रोहित शर्मा म्हणाला. (Image Credit- BCCI)
तसेच मैदानात गर्दी देखील चांगली होती. प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असं रोहित शर्माने सांगितले. (Image Credit- BCCI)